Dilip Walse Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

किरीट सोमय्या यांच्याबद्दल केंद्र सरकारकडे विचारणा करणार : वळसे पाटील

सोमय्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘आयएनएस विक्रांत’ प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबद्दल केंद्र सरकारकडे विचारणा करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी दिली. सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत त्यामुळे तुमचे ‘झेड सिक्युरिटी’ असलेले लोक कुठे आहेत याची केंद्राला विचारणा करू असे वळसे पाटील म्हणाले. मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वळसे पाटील म्हणाले, ‘‘ दुसऱ्यांवर आरोप करणे सोपे असते आणि मग स्वतःवर आरोप झाले की सामोरे जायचे नाही हे शूरपणाचे लक्षण नाही.’’

गुणरत्न सदावर्ते यांच्याविषयी रीतसर चौकशी सुरू आहे. जी माहिती पोलिसांना मिळत आहे ती माहिती न्यायालयात देत आहे. त्यामुळे चौकशीचा भाग काय आहे किंवा नाही यापेक्षा हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना माहिती उघड करणे योग्य नाही, असेही वळसे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सिल्व्हर ओक हल्ल्याबाबत ४ एप्रिलला गुप्तचर विभागाने पत्र लिहून कळविले होते तरीसुद्धा दुर्लक्ष झाले. याप्रकरणी संबंधित पोलिस उपायुक्त यांची बदली करण्यात आली आहे. गावदेवी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाला निलंबित केलेले आहे. अधिक चौकशी सुरू असून या चौकशीतून जे पुढे येईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी वक्तव्य करू नये. जनतेनेही अशा विधानांना बळी पडू नये. आगामी सण शांततेत आणि आनंदाने पार पाडावेत यासाठी पूर्ण तयारी झाली आहे.

- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT