Sanjay Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्रीय यंत्रणा हुकूमशाहीसाठी काम करत आहेत: संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी म्हटलंय की, श्रीधर पाटणकर फक्त मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचे सदस्य नाहीयेत तर ते आमच्या सर्वांच्याच परिवाराचे सदस्य आहेत. मात्र, अशा कारवाया या सूडबुद्धी आणि कोणतीही पूर्वसूचना न देता केल्या जात आहेत. आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, असं दाखवण्यासाठी या प्रकारच्या कारवाया होत आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे भाजपचं सरकार नाही, त्या ठिकाणी अशा कारवाया सुरु आहेत. काल ममता बॅनर्जींच्या भाच्याला आठ तास बसवून चौकशी केली जात आहे.

पुढे ते म्हणाले की, ज्यांनी आपला पराभव केला आहे, त्यांच्यावर केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे. संसदेत कालच जी माहिती आली आहे, त्यानुसार सर्वाधिक कारवाया भाजपचं शासन नसलेल्या राज्यात आणि भाजपच्या कार्यकाळातच झाल्या आहेत. मोदींच्या शासनास 2500 आसपास कारवाया केल्या आहेत. अनेक कारवाया चुकीच्या पद्धतीने झाल्याचं कोर्टात स्पष्ट झालं आहे. मात्र, या सगळ्या यंत्रणा आता हुकुमशाहीसाठी काम करत असल्याचं स्पष्ट होतंय.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय की, ईडीची कारवाई हा काही आता नवा विषय राहिला नाहीये. आपल्याला लक्षात असेल की छगन भुजबळ यांच्यावर याआधी हेतुपुरस्सर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. म्हणून मी आपल्याला सांगतो की, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचं काम केंद्रातील भाजपचं सरकार ठरवून करत आहे. विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन हल्ले करुन घाबरवण्याचं काम करत आहे. महागाई असेल, बेरोजगारी असेल अशा महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad: रोहित शर्माच्या सोबतीला सलामीसाठी दोन पर्याय! IPL 2026 Auction नंतर मुंबईचा संघ; तगडी Playing XI

Yavatmal News : बोगस मतदारांनंतर जन्म मृत्यूचीही बोगस नोंद? गावची लोकसंख्या दीड हजार, पण नोंदी २७ हजारापेक्षा जास्त; मुंबई कनेक्शन समोर...

Gevarai BJP Leader Balraje Pawar Arrest: गेवराईत भाजपच्या बाळराजे पवारांना मध्यरात्री अटक ; नगरपालिका मतदानाच्या दिवशी झाला होता राडा!

Thane News: उंच टॉवर, स्नो पार्क, टाउन पार्क आणि... ठाण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार, भव्य प्रकल्पांची घोषणा

किती घाण दाखवताय... मराठी मालिकेतील नवऱ्याचा क्रूरपणा पाहून प्रेक्षक संतापले; म्हणतात- आताचे पुरुष असे आहेत?

SCROLL FOR NEXT