maharashtra vidhansabha election dates esakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

schedule of assembly elections is almost certain : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून येत्या 27 आणि 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोमाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत विधानसभेला होणार अशी अपेक्षा असतानाच राज्यात तिसरी आघाडी देखील स्थापन करण्यात आली आहे. राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, संभाजीराजे यासोबतच इतर काही नेत्यांनी एकत्र येत काही दिवसांपूर्वी 'परिवर्तन महाशक्ती' नावाने तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे आगावी विधानसभा निवडणुक अधिक रंजक झाली आहे.

दरम्यान राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये सध्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात जागांच्या वाटपावरून वाद सुरू आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये देखील अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यातच आता लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

वंचितची पहिली यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून ११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच उमेदवारांची नावे जाहीर करून आंबेडकरांनी आघाडी घेतली आहे.

वंचित आघाडीकडून रावेर, सिंधखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर साऊथ वेस्ट, साकोली, नांदेड साऊथ, लोहा, औरंगाबाद इस्ट, शेवगाव, खानापूर या मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT