Ajit Pawar Twitter
महाराष्ट्र बातम्या

राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले; अजित पवार म्हणाले केंद्राने...

मुंबईनंतर पुण्यातही ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे.

सुधीर काकडे

मुंबई: राज्यात ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढला असून पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ७ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर आता चिंता वाढली असून, राज्य सरकार नवे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. त्याच पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही चिंता व्यक्त केली आहे. निर्बंध लागू करणार का असा प्रश्न विचारला असता, आम्ही नियमांचे पालन होत की नाही हे बघत आहोंत असं त्यांनी सांगितलं. तसेच केंद्राने देखील नियम कठोर केले पाहिजे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग होत आहे. देशपातळीवर आरोग्य विभागाने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

अजित पवार यांनी यावेळी बोलताना लोक कार्यक्रमांना गर्दी करत असल्याचं सांगितलं. काही राजकीय लोकांची लग्न झाली त्याला देखील प्रचंड गर्दी होती असं ते यावेळी म्हणाले. ओमिक्रॉन बाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने (Central Government of India) घ्यायला हवं. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं. कारण कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT