Maharashtra Politics
Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा भूकंप? पवार-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा शेलारांना फोन

अंकिता खाणे (Ankita Khane)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यानी अमित शाह यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहीती समोर आली आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडीसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावणकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शाह यांना दिली आहे.

तर या दोन्ही भाजप नेत्यांनी दिल्लीत अमित शाह आणि जे पी नड्डा यांची घेतली भेट यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील राजकीय परिस्थितिमध्ये अनेक घडामोडी घडत असताना दिसत आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. या संपूर्ण घडामोडींचा आढावा शाह यांनी दोन्ही नेत्यांकडून जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते बैठका देखील घेणार असल्याची माहीती समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात अमित शाह लक्ष घालत असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

महाविकास आघाडी आणि त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुरबूर हा राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते -पंतप्रधान मोदी

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT