Narayan-Rane 
महाराष्ट्र बातम्या

नारायण राणे चिपळूणमध्ये, मोठा पोलीस फौजफाटा तैनात

कोकणात राणेंची राजकीय ताकद कमी झाली असली, तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

दीनानाथ परब

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांनी (shivsena) आधीच राणेंविरोधात बॅनरबाजी सुरु केली असून आज राज्यभरात आक्रमक आंदोलन (protest) करण्याची सेनेची रणनीती आहे. दरम्यान नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु असून ते सध्या चिपळूणमध्ये आहेत.

चिपळूणमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. चिपळूणमधील हॉटेल रीम्स येथे नारायण राणे थांबले आहेत. रात्री उशिरा राणे येथे दाखल झाले. सध्या त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र निलेश राणे आहेत. प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी शासकीय विश्रामगृहात थांबले असल्याची माहिती आहे. नारायण राणेंचे आज चिपळूणमध्ये काही कार्यक्रम असून ते बाजारपेठेत व्यापाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या महापुरात चिपळूण बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांच्याशी राणे आज संवाद साधू शकतात.

कोकणात शिवसेनेचे वर्चस्व आहे. कणकवली विधानसभेची जागा सोडल्यास अन्यत्र शिवसेनेचे आमदार-खासदार आहेत. कोकणात राणेंची राजकीय ताकद कमी झाली असली, तरी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. राणे समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढले आहेत. नाशिक, पुणे आणि महाड येथे नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी चाचपणी सुरु आहे. वकिलांचा सल्ला घेण्यात येत आहे, अशी माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT