varun-sardesai.jpg 
महाराष्ट्र बातम्या

वरुण सरदेसाई आता आला, तर परत जाणार नाही - नारायण राणे

"39 वर्ष सोबत होतो, सगळं ठाऊक आहे काय काय घडलंय, माझ्यावर बोलू नका"

सुमित सावंत

रत्नागिरी: कोकणात (kokan) झालेल्या अटकेमुळे (rane arrest) स्थगित झालेली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशिर्वाद यात्रा (narayan rane jan ashirwad yatra) पुन्हा सुरु झाली आहे. यात्रेच्या सुरुवातीला राणेंनी शिवसेनेवर (shivsena) टीका करायचं टाळलं होतं. पण नंतर त्यांनी त्यांच्या मूळ आक्रमक शैलीत शिवसेनेवर प्रहार केले. "उगाच दादागिरी करू नका, तुमचा पिंड नाही, वाट्याला जाऊ नका" असा इशारा नारायण राणेंनी दिला.

"घरात बसून नाही राहायचं आहे. आम्ही बघा फिरतो. घरात बसून, काही होत नाही. 39 वर्ष सोबत होतो, सगळं ठाऊक आहे. काय काय घडलंय, माझ्यावर बोलू नका. आता माजी म्हणताय, ते आजी आमदार होणार. आमच्या घराबाहेर कोणीतरी देसाई येतो, काय त्याचं नाव? वरूण सरदेसाई. त्याला अटक होत नाही, नातलग आहे, जमा करू देतो, एवढे पोलीस असले तरी मार खातो. आता आला तर परत जाणार नाही, त्याने परत येऊच दे. आता नाही सोडणार" असे नारायण राणे म्हणाले.

"छोट्यातल्या छोट्या व्यावसायिकाला कोट्यवधींच कर्ज मिळेल. आम्हाला विकासात्मक विधायक काम करायचं आहे. घरात बसून नाही राहायचय. आम्ही बघा फिरतो. घरात बसून, काही होत नाही. 39 वर्ष सोबत होतो, सगळं ठाऊक आहे काय काय घडलंय, माझ्यावर बोलू नका" असे राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डिझेलचा भडका, एसटीच्या तिकीट दराचे काय? परिवहन मंत्री म्हणाले, महामंडळाला तोटा होतोय, सध्या...

Ambenali Accident: आंबेनळी ठरतोय मृत्यूचा घाट, ८ वर्षांपूर्वी झालेला ३३ जणांचा मृत्यू; गेल्या तीन महिन्यात तिसरी दुर्घटना

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Latest Marathi News Live Update : अर्जुन खोतकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

Blackmail case: महिलेसोबतच्या व्हिडीओवरून ब्लॅकमेल, बँक कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; ६ जणांवर गुन्हा, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT