Shinde Vs Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shinde Vs Thackeray : "निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवतेय"

निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा खैरेंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

गेल्या ६ महिन्यांपासून शिवसेना कुणाची? या प्रश्नामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात मात्र यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट शिंदे गटासाह निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यावर आरोप केले आहेत.

शिवसेना कोणाची यासंबधी सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या भुमिकेवर खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सुनावणीसंबधी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर काही लोकं बातम्या पुरवत आहे. निवडणूक आयोगात जर आम्ही एखादा अर्ज दिला, तर त्याच्या पाच मिनिटापूर्वीच त्यांचा देखील अर्ज येतो. त्यामुळे कुठेतरी लिकेज होत आहे.

केंद्र शासनाच्या काही यंत्रणा अशा आहेत की, आम्ही कोणता कागद दिला आणि त्यापेक्षा शिंदे गटाने कोणता कागद द्यावा याबाबत माहिती पुरवतात, असा दावा खैरे यांनी केला आहे. त्यामुळे खैरे यांच्या दाव्यामुळे थेट निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.

तर आज राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू झाली. यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळी साळवे यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे नबाम रेबिया प्रकरणापेक्षा कसं वेगळं आहे, हे समजवून सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला. तर सिब्बल यांचे दावे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्याकडून खोडून काढण्यात आले.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : लोकलने स्टेशन चुकवलं, प्लॅटफॉर्म सोडून २ किमी पुढे थांबली; गाडीतल्या प्रवाशांना रुळावर उतरण्याची वेळ, चूक कुणाची?

MPSC Exam : सोलापूरचा विजय लामकाने प्रथम; महिला प्रवर्गातून आरती जाधव प्रथम

Chhatrapati Sambhajinagar: व्यापाऱ्याचे दोन किलो सोने लंपास; गुजरातच्या तिघांविरोधात गुन्हा, सव्वातीन कोटींची फसवणूक

Silver Trader Death : सांगलीतील 24 वर्षीय चांदी व्यावसायिकाचा कोल्हापुरात संशयास्पद मृत्यू; चांदीच्या पार्सलमध्ये आढळलं तांबं, घटनेने मोठी खळबळ

Supreme Court: न्यायाधीशाला ‘विकण्याचा’ प्रयत्न, ३० लाखांच्या लाच प्रकरणात ७० वर्षीय वकिलाला सुप्रीम कोर्टाचा जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT