nana patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग ठरवून होतोय; ईडीच्या नव्या कारवाईनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं असून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले यांनी म्हटलंय की, ईडीची कारवाई हा काही आता नवा विषय राहिला नाहीये. आपल्याला लक्षात असेल की छगन भुजबळ यांच्यावर याआधी हेतुपुरस्सर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. म्हणून मी आपल्याला सांगतो की, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करण्याचं काम केंद्रातील भाजपचं सरकार ठरवून करत आहे. विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन हल्ले करुन घाबरवण्याचं काम करत आहे. महागाई असेल, बेरोजगारी असेल अशा महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.

हा महाविकास आघाडीला इशारा आहे का? या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटलंय की, महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. हताश झालेली भाजप केंद्रात बसलेली आहे. देश विकणारी भाजप केंद्रात बसलेली आहे. त्यांच्या या अशा धमक्यांना महाविकास आघाडी घाबरत नाही. पुढे त्यांनी म्हटलंय की, अनिल देशमुख यांच्याही प्रकरणात त्यांना कसलाही पुरावा मिळाला नाही. दररोज काहीतरी उकरुन काढायचा प्रयत्न ईडी करत आहे. या सगळ्याचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT