varsha gaikwad varsha gaikwad
महाराष्ट्र बातम्या

'हायकोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करुन 11 वीची प्रवेश प्रक्रिया राबवणार'

सकाळ डिजिटल टीम

राज्यात अकरावीच्या प्रवेशासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्दचा निर्णय दिला आहे.

मुंबई - राज्यात अकरावीच्या प्रवेशासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी रद्दचा निर्णय दिला आहे. त्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे राज्य सरकारने प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी जाहीर करून त्यासाठी रजिस्ट्रेशनही सुरु केले. मात्र आता उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करून प्रवेश दहावीच्या गुणांवरच देण्याचा निर्णय दिला. यावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, न्यायालयाचे स्टेटमेंट आमच्याकडे आलेले नाही. ते हातात आल्यानंतर नेमका निर्णय काय दिलाय हे पाहूनच आम्ही निर्णय घेऊ.

न्यायालायने 28 मे चा आदेश रद्द केला आहे. त्यावेळी म्हटलं आहे की, मुंबई लोकलमध्ये सर्वांनाच प्रवेश नाही मग सीईटी कशी घेणार होता. विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करायचा असे सवालही न्यायालायने विचारले. निकालाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की,'मुलांचे अकरावीचे प्रवेश लवकरात लवकर व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. आधीच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. आता न्यायालायच्या निर्णयाचा अभ्यास करून त्यानंतर प्रवेशा संदर्भातला निर्णय घेऊ.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT