CET Cell esakal
महाराष्ट्र बातम्या

CET Cell : विद्यार्थ्यांच्या रेट्यानंतर ‘सीईटी सेल’ नरम! बीई, फार्मसी, कृषी परीक्षार्थींना नव्याने उत्तर तालिका देणार

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’त अनेक प्रकारच्या तक्रारीनंतर ‘सीईटी सेल’ कोंडीत सापडल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या ‘सीईटी’त अनेक प्रकारच्या तक्रारीनंतर ‘सीईटी सेल’ कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे समाधान करण्यासाठी त्यांना २७ आणि २८ जून या दोन दिवसांसाठी त्यांच्या उत्तर तालिका (अन्सर की) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबत ज्या विद्यार्थ्यांनी तक्रारीसाठी शुल्क भरले होते त्यांचे शुल्कही परत देणार असल्याची माहिती ‘सीईटी’चे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

सीईटी परीक्षेत समोर आलेल्या ५४ चुका, त्यासोबत ग्रेस मार्क आदींवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले. त्यातच विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही हा विषय लावून धरल्याने ‘सीईटी’चे आयुक्त सरदेसाई, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी (ता.२२) मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली.

त्यात आयुक्तांनी ही माहिती देत विद्यार्थ्यांनी कमी पर्सेंटाईल मिळाले म्हणून नैराश्यात जावू नये, असे आवाहन केले. सरदेसाई यांनी सांगितले की, ‘‘सीईटीची परीक्षा ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेण्यात आली आहे. या परीक्षेचा पॅटर्न हा मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. काही परीक्षांवर आक्षेप घेतले जात असले तरी, त्याचे निराकरणही लगेच केले जाते.

यंदा ५४ विद्यार्थ्यांचे आक्षेप हे ग्राह्य होते. त्याचे निराकरण करण्यात आले आहे. कुठेही पेपरफुटीसारखे किंवा इतर गैरप्रकार झालेले नाहीत. शिवाय काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देखील दिले नाहीत. या परीक्षेत केवळ पर्सेंटाईल दिले जाते. यात प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे.’’ सीईटी परीक्षा व निकालाच्यासंदर्भात सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता अथवा खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तयारी सीईटी सेलने केली असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

प्रमुख मुद्दे

  • सीईटीला बसलेल्या सहा लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले नाहीत

  • एखाद्या प्रश्नांचे उत्तर चुकीचे असल्यास त्या प्रश्नाला उणे गुण (निगेटीव्ह मार्क्स) देण्याची पद्धत नाही

  • कोणत्याही विद्यार्थ्यांना अनुग्रह गुण (ग्रेस मार्क) देण्यात आलेले नाहीत

  • आक्षेपांची विषयनिहाय तज्ज्ञांकडून पडताळणी करून उत्तर तालिकेत योग्य ते बदल केले.

  • परीक्षा वेगवेगळ्या बॅचद्वारे घेऊन त्याची एकच गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येते.

  • सीईटीकडे आलेल्या सर्व निवेदनांची शहानिशा करून तक्रारीचे निराकरण करण्यात आले.

आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीस

‘सीईटी’च्या निकालात बऱ्याच त्रुटी आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गुण, श्रेणी यातही चुका असून समान गुण आणि पर्सेंटाईल यातही तफावत असल्याने विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असल्याने ते दूर व्हावे, यासाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या निवेदनात सीईटीच्या परीक्षेची निष्पक्ष चौकशी करून झालेल्या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच आयुक्तांना निलंबित करावे आदी मागण्या केल्या आहेत. ठाकरेंच्या भेटीमुळे राजकारण तापले आहे.

सीईटीची प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आणि विश्वासार्ह पद्धतीने घेतली जाते. यासाठी न्यायालयानेही कौतुक केले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे हित सर्वांसाठी म‍हत्वाचे आहे. मात्र, त्यावर सध्या काही राजकारण सुरू असून ते होऊ नये.

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीकृष्णाप्रमाणे कोणत्याही मुलाला तुरुंगात जन्माचे दुःख सहन करावे लागू नये; निदा खानला जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय म्हटले?

मोठी बातमी! गौतम गंभीरच्या निरोपाची वेळ जवळ आली... BCCI ने सुरू केलीय तयारी; कामगिरीवर नाराजी, नेमकं काय घडतंय?

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! मराठवाडा विद्यापीठात 'या' 55 जागांवर मिळणार थेट प्रवेश; कुलगुरूंचा मोठा निर्णय

Hingoli Earthquake: जमीन अन् माणसेही हादरली! मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्यांनी कळमनुरीकर भयभीत; खुल्या जागेत आश्रय घेत रात्र काढली जागून..

महाराष्ट्रातून थेट पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संपर्क? ATS कडून मुंबई ठाण्यासह १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी, नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT