Student sakal media
महाराष्ट्र बातम्या

अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी यावर्षी दोनदा ‘सीईटी’! आता २६ एप्रिलपर्यंत ऑनलाईन परीक्षा; मे महिन्यात विद्यार्थ्यांना पुन्हा संधी, वाचा...

अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी सध्या ११ ते २६ एप्रिल या कालावधीत (सुट्ट्यांचे दिवस वगळून) नोंदणीकृत विद्यार्थ्यांची ‘सीईटी’ सुरु आहे. दोन सत्रात (सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५) ऑनलाईन परीक्षा होत आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी सध्या ११ ते २६ एप्रिल या कालावधीत (सुट्ट्यांचे दिवस वगळून) नोंदणीकृत विद्यार्थ्यांची ‘सीईटी’ सुरु आहे. दोन सत्रात (सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५) ऑनलाईन परीक्षा होत आहे.

सोलापूरसह राज्यभरातील साडेसात लाख विद्यार्थ्यांनी फार्मसी व अभियांत्रिकी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यामुळे ११ एप्रिलपासून पुढील १५ दिवस ‘सीईटी’ होत आहे. २०० गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ असतो. प्रत्येक सत्राचा पेपर वेगवेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक बॅचच्या ज्या विद्यार्थ्यास सर्वाधिक गुण मिळतात त्यावरुन पर्सेंटाईल ठरते. सर्वाधिक पर्सेंटाईलवरुन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

दरम्यान, ‘जेईई’च्या धर्तीवर आता अभियांत्रिकी व फार्मसी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना देखील ‘सीईटी’च्या दोन संधी मिळणार आहेत. मे महिन्यात पुन्हा एकदा ‘सीईटी’ होणार आहे. आता सुरु असलेल्या ‘सीईटी’त कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना किंवा काही अडचणीमुळे ज्यांना ‘सीईटी’ देता आली नाही, त्यांना मे महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार आहे.

  • सोलापूर जिल्ह्याची स्थिती

  • अभियांत्रिकी कॉलेज

  • १५

  • अंदाजे प्रवेश क्षमता

  • ७५००

  • फार्मसी कॉलेज

  • ७

  • प्रवेश क्षमता

  • १५००

पर्सेंटाईलवरुन विद्यार्थ्यांना प्रवेश

सध्या अभियांत्रिकी व फार्मसी कॉलेजमधील प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेतली जात आहे. मे महिन्यात विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ‘सीईटी’ची संधी मिळणार आहे. ‘सीईटी’च्या पर्सेंटाईलवरुन विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्यांच्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येतो.

- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी कॉलेज, केगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT