Eknath Shinde
Eknath Shinde esakal
महाराष्ट्र

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद नरेंद्र पाटलांनाच देणार: मुख्यमंत्र्यांच अश्वासन

सकाळ डिजिटल टीम

माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यालात रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहून माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांना विनम्र आदरांजली अर्पण केली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं,

ते म्हणाले "माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन कायमच प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल. माथाडी कामगारांचे रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील.माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. अशी अश्वासने उपस्थितांना दिली.

मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटील यांना अश्वासन दिले की पुढील काळात, स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले "काही चुकीचे लोक घुसून माथाडी चळवळ बदनाम करत आहेत. प्रामाणिक माथाडीच्या केसाला धक्का लागू देणार नाही. पण माथाडी दाखवून माथाडींना कामच द्यायचे नाही आणि वसूली करायची, अशा वसुलीसम्राटांची गय करणार नाही." असं म्हणत त्यांनी एक प्रकारे चळवळीतील लोकांना दम भरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT