Uday Samant  sakal
महाराष्ट्र बातम्या

परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक निर्णय घेतील - सामंत

डेक्कन म्युझियमसाठी आज आर्थिक तरतूद करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

डेक्कन म्युझियमसाठी आज आर्थिक तरतूद करण्यात आली.

परीक्षेसाठी सर्व विद्यापीठांनी एकच समान पद्धत वापरावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. टाळेबंदीनंतर विस्कटलेली शैक्षणिक गणिते आणि त्यामुळे निर्माण झालेली विषमता याचा फटका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समान परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार संचालक निर्णय घेतील, गरज पडली तर मी हस्तक्षेप करेल असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विद्यापीठांना सूचना केल्या आहेत. विद्यापीठांनी समानतेने परीक्षा घेत ऑफलाईन परीक्षाच घेण्यात याव्या, असंही ते म्हणाले आहेत. डेक्कन म्युझियमसाठी आज आर्थिक तरतूद करण्यात आली. हे अभिमत विद्यापीठ शनिवार आणि रविवार खुले ठेवण्याचे आयोजन केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढे मंत्री सामंत म्हणाले की, काल केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. राज्याचे ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील विद्यार्थी येथे आहेत. या जिल्ह्याचे नाव घेण्याचे कारण येथील शेतकऱ्याचे मुलांना यात घवघवती यश मिळावं म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले आहेत. या परीक्षेत महिला सक्षम असल्याचं दिसलं आहे. यानिमित्ताने अनेकांच्या डोळ्यांत अंजन गेले आहे, असा टोलाही त्यांनी मारला आहे.

ते म्हणाले, लोकसेवा आयोगमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरू निवडण्याचे अधिकार राज्यपाल महोदय यांनाच आहे त्यामुळे त्यात आम्ही हस्तक्षेप करत नाही. सीईटी साठी पुढील वर्षी १ जुलै रोजी निकाल लागावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT