chaitya bhoomi Team esakal
महाराष्ट्र बातम्या

चैत्यभूमीवर तणाव; पोलीस, अनुयायांमध्ये झटापट

चैत्यभूमिच्या परिसरात तणावपुर्ण शांतता

सुधीर काकडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) आज मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली. मात्र ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी जास्त लोकांना गर्दी केल्यास मनाई केली. यावेळी संतप्त अनुयायांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असून, काही काळ वाद निर्माण झाल्याचं समजतं आहे. त्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, परिसरात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर (Chaitya Bhoomi) मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक एकत्र येत असतात. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या राज्यासह देशभरातील लोकांचा समावेश असतो. यावेळी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न करण्याचं आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचं आवाहन मुंबई महानगर पालिकेने केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनुयायांमध्ये तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस आणि अनुयायी यांच्यात काही काळ झटापट देखील झाली.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाकडून दरवर्षी चैत्यभूमीवर व्यवस्था करण्यात येत असते. मात्र यंदा काही व्यवस्था करण्यात न आल्याचा आरोप अनुयायांकडून केला जातो आहे. त्यामुळे देखील त्यांच्या नाराजी निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT