Chaitya Bhoomi Mahaparinirvan Din esakal
महाराष्ट्र बातम्या

जातभावना प्रबळ होत असतानाच बाबासाहेबांच्या 'या' पुस्तकाची वाढतेय मागणी; मराठी पुस्तकाच्या छापल्या तब्बल 50 हजार प्रती

बाबासाहेब म्हणतात, आंतरजातीय विवाह हाच जातिअंतासाठीचा प्रभावी मार्ग आहे, अशी माझी खात्री पटली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या मराठी पुस्तकाच्या ५० हजार २५२ प्रती छापल्या आहेत. आता त्यांच्या १ लाखांवर प्रती खपल्या आहेत.

सांगली : सध्या जातभावना प्रबळ होत असताना १९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लाहोरच्या ‘जातपात तोडक मंडळ’ नावाच्या सवर्ण हिंदूंच्या सुधारणावादी मंडळाच्या वार्षिक परिषदेसाठी तयार केलेले, पण न झालेले भाषण आज दिशादर्शक असे आहे. त्यांच्या भाषणाचे पुस्तक राज्य शासनाने प्रसिद्ध केले आहे. या भाषणात आंतरजातीय विवाह हे जातिसंस्था निर्मूलनाचे प्रभावी हत्यार आहे, असे ठामपणे नमूद केले. आज ८८ वर्षांनंतर ते प्रकर्षाने दिसून येत आहे.

या भाषणात जातीचे निर्मूलन करायचे कसे, हे कार्यक्रमात ते मांडतात. त्यांच्या मते, जातिनिर्मूलनाची पहिली पायरी पोटजाती निर्मूलनापासून केली पाहिजे. दुसरी पायरी जातींच्या सहभोजनाच्या कार्यक्रमाची सुरवात. तिसरी आणि बाबासाहेबांच्या मते प्रभावी पायरी म्हणजे आंतरजातीय विवाह. बाबासाहेब म्हणतात, आंतरजातीय विवाह हाच जातिअंतासाठीचा प्रभावी मार्ग आहे, अशी माझी खात्री पटली आहे.

केवळ रक्ताची सरमिसळ आप्तस्वकीय असल्याची भावना निर्माण करू शकते. जात मोडण्यासाठीचा खरा उपाय आंतरजातीय विवाह हाच आहे.’’ हे भाषण मुंबईतील भारतभूषण प्रिंटिंग प्रेसने ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ (Annihilation of Caste) या शीर्षकाने पुस्तकरुपात प्रकाशित केले होते. २०१५ मध्ये ते राज्य सरकारने प्रा. प्रकाश शिरसट यांच्याकडून ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ या नावाने मराठीत भाषांतरित करवून घेतले. १९३६ ते २०१३ या काळात या इंग्रजी पुस्तकाच्या १४ आवृत्त्या छापल्या आहेत.

या मराठी पुस्तकाच्या ५० हजार २५२ प्रती छापल्या आहेत. आता त्यांच्या १ लाखांवर प्रती खपल्या आहेत. कोल्हापुरातील शासकीय मुद्रणालयात पुस्तक उपलब्ध आहे, ज्याची सर्वाधिक मागणी नोंदवली जाते. सन १९३६ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली. राज्य शासनाने अवघ्या पंधरा रुपयांत ते उपलब्ध करून दिले आहे. हे पुस्तक आज सर्व जाती, संघटनांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे असून त्याची अधिकाधिक प्रसिद्धी व्हायला हवी. हे पुस्तक जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी मार्गदर्शक ठरत असून वाचकांना हलवून सोडणारे ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT