solapur mahapalika

 
महाराष्ट्र बातम्या

कॅबिनेट मंत्री अन्‌ आमदारास नडला, भाजपचा चक्रव्यूह भेदून सोलापुरात शिवसेनेचा ‘हा’ वाघ जिंकला! काँग्रेस शहराध्यक्षांचाही २५१ मतांनी विजय

प्रभाग सातमधून आमदार देवेंद्र कोठे पहिल्यांदा नगरसेवक झाले होते. कोठे आमदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार कोठे यांनी विशेष लक्ष दिले होते. पण, त्यांचा चक्रव्यूह भेदून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी विजय खेचून आणला.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : प्रभाग सातमधून आमदार देवेंद्र कोठे पहिल्यांदा नगरसेवक झाले होते. कोठे आमदार झाल्यानंतर त्यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर पद्माकर काळे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. या प्रभागात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार कोठे यांनी विशेष लक्ष दिले होते. पण, त्यांचा चक्रव्यूह भेदून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी विजय खेचून आणला.

महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत प्रभाग सातमधून देवेंद्र कोठेंसह सारिका पिसे, मंदाकिनी पवार, अमोल शिंदे विजयी झाले होते. पण, कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुढे ते शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. मात्र, अमोल शिंदे शिवसेनेत राहिले. महापालिकेत जागा वाटपात न जमल्याने राज्यातील सत्ताधारी पक्ष एकमेकांविरुद्ध लढले. भाजप स्वबळावर लढणार असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली. त्यात अमोल शिंदेच सर्वाधिक वेळा माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठेंवरच बोलले. त्यामुळे अमोल शिंदेंचा पराभव होईल, असा विश्वास भाजपमधील प्रत्येकाला होता. मात्र, भाजपअंतर्गत नाराजी आणि सूक्ष्म रणनीतीचा फायदा अमोल शिंदेंना झाला आणि या प्रभागात त्यांनी स्वत:बरोबरच तीन उमेदवारांना निवडून आणले.

आयुष्यातील हा सर्वात मोठा विजय

प्रभागात केलेल्या विकासकामांच्या बळावर आम्ही जनतेला मते मागितली. प्रभागात चुकीच्या पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न झाला, पण मतदारांनी निवडणूक हाती घेतली होती. प्रभाग ७ मधील सर्व मतदारांनी लोकशाही जिवंत ठेवत आम्हाला निवडून दिले. राज्याचे कॅबिनेट मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांनी या प्रभागात विशेष लक्ष घातलेले असताना देखील आम्ही विजय मिळवला. आयुष्यातील हा सर्वांत मोठा विजय मानतो.

- अमोल शिंदे, नगरसेवक, शिवसेना

पालकमंत्री व आमदारांना नडला अन्‌ जिंकलाही

प्रभाग ७ मध्ये निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपत दाखल झालेल्या पद्माकर काळे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणूक प्रचारात अमोल शिंदेंनी आमदार कोठेंनाच आव्हान दिले. त्यानंतर पालकमंत्री रात्री उशिरा प्रभागात चहा पीत बसल्याने अमोल शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री गोरे व आमदार कोठे हे धनगर, मराठा व दलित समाजाचे नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर प्रभागातील वातावरण फिरले आणि शिंदेंची खेळी यशस्वी ठरली.

प्रभाग १५ मध्ये क्रॉस वोटिंग; भाजपचे तीन अन्‌‌ काँग्रेसचे नरोटे विजयी

प्रभाग १५ मध्ये भाजपकडून श्रीदेवी फुलारे, विनोद भोसले, अंबादास करगुळे व विजया खरात हे उमेदवार होते. त्यातील अंबादास करगुळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे होते. या प्रभागातून विजया खरात, श्रीदेवी फुलारे, विनोद भोसले यांनी विजय मिळविला, पण अंबादास करगुळे यांना पराभव पत्कारावा लागला. करगुळे यांना आठ हजार २४४ मते मिळाली तर नरोटे यांनी आठ हजार ४९५ मते घेतली. या ठिकाणी ‘नोटा’ला ३०८ मतदान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT