Weather Update  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा! कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातील बुलडाणा, वाशिम, अकोला, नागपूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, राज्यातील 5 ते 6 जिल्हे वगळता राज्यभरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यातही आज यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारपासून(२२ सप्टेंबर) पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तर सुकलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर राज्यात काही भागात पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अमरावती जिल्ह्यातही आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Dahihandi: मुंबईत थरांचा थरार! दहीहंडी उत्सवात २२ गोविंदा जखमी

दहीहंडीच्या मंचावर सेलिब्रिटींची चांदी! काही मिनिटांच्या हजेरीसाठी किती पैसे घेतात कलाकार? अनेकांचा वर्षाचा पगारही पडेल कमी

निवृत्तीनंतरही अभिमन्यूची पुन्हा एन्ट्री! म्हैसूर दसरोत्सवात यंदाही खास सहभाग, ‘कॅप्टन हत्ती’ म्हणून जम्बो सवारीतही दिसणार

Marathi News Live Updates: दिल्लीत मुसळधार पावसामुळे विमानतळ उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना आधीच मिळतात भविष्याचे संकेत; येणाऱ्या संकटांचा आणि घटनांचा होतो पूर्वाभास!

SCROLL FOR NEXT