महाराष्ट्र बातम्या

पूर्वमोसमी पावसाने उन्हाचा चटका कमी; राज्यात  पावसाची शक्यता 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पूर्वमोसमी पावसाचे ढग, वाहणारे वारे यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी वाढलेला उन्हाचा चटका पुन्हा चाळीशीच्या खाली घसरला आहे. सोमवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वाशीम येथे देशातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज (ता.२१) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने जोरदार वाऱ्याचे प्रवाह वाहत आहेत. तर दुपारनंतर ढग जमा होत असल्याने उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. जळगाव, धुळे, मालेगाव, अकोला वगळता राज्यात सर्वच ठिकाणी तापमान चाळीशीच्या खाली घसरले आहे. हंगामातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेल्या अकोला येथे तापमान ४०.६ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्याच्या चारही हवामान विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजा, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोमवार (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.३, जळगाव ४०.६, धुळे ४०.६, कोल्हापूर ३४.०, महाबळेश्‍वर ३२.७, मालेगाव ४०.६, नाशिक ३८.४, निफाड ३७.८, सांगली ३६.४, सातारा ३८.१, सोलापूर ३९.४, डहाणू ३४.५, सांताक्रूझ ३४.९, रत्नागिरी ३६.९, औरंगाबाद ३९.२, परभणी ३९.८, अकोला ४०.६, अमरावती ३८.६, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ३८.५, चंद्रपूर ३७.०, गोंदिया ३५.०, नागपूर ३७.५, वाशीम ४२.६, वर्धा ३८.०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT