Anil Deshmukh e sakal
महाराष्ट्र बातम्या

चांदिवाल आयोगानं अनिल देशमुखांना ठोठावला ५० हजारांचा दंड!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलटतपासणी सुरू आहे. मात्र, आज देशमुखांचे वकील उलटतपासणीसाठी आयोगासमोर उपस्थित नव्हते. त्यामुळे आयोगाने देशमुखांना ५० हजार रुपयांचा दंड (Chandiwal Commission Fine On Anil Deshmukh) ठोठावला असून हा दंड मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या मदतीने खंडणीचं रॅकेट चालवत असल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी बडतर्फ केलेल्या सचिन वाझेला एनआयएने अटक केली होती. त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलटतपासणी करण्याची परवानगी मागितली होती. विशेष न्यायालयाने देशमुखांच्या वकिलांना ही परवानगी दिली होती. त्यासोबतच देशमुखांना चांदिवाल आयोगासमोर हजर राहण्याचीही परवानगी दिली होती. आतापर्यंत दोनवेळा अनिल देशमुखांच्या वकिलांनी वाझेची उलटतपासणी केली आहे. यापूर्वी १४ डिसेंबरला सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी वाझेनी दिलेल्या उत्तराने खळबळ निर्माण झाली होती. अनिल देशमुखांनी पैसे उकळण्यास सांगितले का? असा प्रश्न वाझेला विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने नाही, असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक नवीन ट्विस्ट आलं होतं.

देशमुखांच्या वकिलांकडून आज पुन्हा वाझेची उलटतपासणी करण्यात येणार होती. मात्र, आज देशमुखांचे वकील आयोगासमोर हजर झाले नाही. त्यामुळे सुनावणी २२ डिसेंबरला साडेबाराला घेण्यात येणार आहे. तसेच आयोगाने देशमुखांना ५० हजार रुपयांचे दंड ठोठावला असून तो दंड मुख्यमंत्री सहायत्ता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी देखील आयोगाने देशमुखांना १५ हजार रुपयांचा दंड आयोगाने ठोठावला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT