chandradip narke from uddhav thackeray faction joins eknath shinde in kolhapur maharashtra politics  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : अमित शहांच्या दौऱ्याचा इम्पॅक्ट! कोल्हापूरात ठाकरे गटाला आणखी एक झटका

सकाळ डिजिटल टीम

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिलं. हा उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आज शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली जात आहे.

काल केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा कोल्हापूर दौऱ्यावर होते. यादौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा एक झटका बसला. ठाकरे गटातील आणखी एक माजी आमदार शिंदेंच्या गोटात सामील झाले आहेत.

ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे शिंदे गटाच्या धनुष्यबाणासोबत असल्याचे बोलले. धनुष्यबाण घेऊनच आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा यावेळी नरके यांनी केली आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर चंद्रदीप नरके नेमकं कोणत्या गटात जाणार हे निश्चित नसल्याचे बोलले जात होते. पण त्यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हा शिंदे गटाला दिल्यानंतर काल कोल्हापूर येथे एकनाथ शिंदे यांचं कार्यकर्त्यां नी जंगी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चंद्रदीप नरके यांनी देखील उपस्थित राहत त्यांचे जोरदार स्वागत केले. तसेच नरके यांनी धनुष्यबाणासोबतच राहाणार असून आगामी निवडणूक देखील धनुष्यबाणासोबतच लढवणार असल्याचे नरके यांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे काल विजय संकल्प रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी शहा यांनी २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सर्व ४८ जागांवर विजय मिळवेल.

जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा आणि विधानसभेच्या सर्व जागांवर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले पाहिजेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहनही केले. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढविण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT