Chandrashekhar Bavankule esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bavankule: एकनाथ शिंदेची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची जाणार? आता पुन्हा... बावनकुळेंचे सुचक विधान

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Chandrashekhar Bavankule BJP State President statement on Devendra Fadnavis: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे दिसून आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे ते चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण एका वेगळ्या दिशेनं चालल्याचा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. त्यावर आता बावनकुळेंनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

वाबनकुळेंच्या त्या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले असून आता त्यांची जागा देवेंद्र फडणवीस घेणार असल्याबाबत बावनकुळे यांनी वक्तव्य केले आहे. एवढचं बोलून ते थांबलेले नाहीत तर यापुढील काळात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांना बसलेलं पाहायचं असेल तर आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे. असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच सध्याचे सरकार हे फेब्रुवारीपर्यतच असल्याचे सुचक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले होते. त्यातच आता बावनकुळे यांनी फडणवीस यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

संत जगनाडे महाराज यांच्यावर आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना बावनकुळे म्हणाले, आता सर्व जातीच्या लोकांनी फडणवीसांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. येणाऱ्या आगामी निवडणूकांमध्ये पुन्हा कोण मुख्यमंत्री झाले पाहिजे असा प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित नागरिकांना विचारला होता. त्यावेळी लोकांकडून फडणवीस असे उत्तर आल्यानंतर बावनकुळेंनी आता आपण त्यांच्यापाठीमागे उभी राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT