chandrakant khaire criticize cm eknath shinde over cm eknath shinde paithan speech
chandrakant khaire criticize cm eknath shinde over cm eknath shinde paithan speech  esakal
महाराष्ट्र

'मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते'; सेना नेत्याचा शिंदेंच्या भाषणावर आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी औरंगाबादच्या पैठणमध्ये भव्य सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे पिता-पुत्रावर टीकास्त्र सोडत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते. अशा आरोप केला आहे.(chandrakant khaire criticize cm eknath shinde over cm eknath shinde paithan speech)

'मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैठणमधील फक्त २५ टक्के लोक होते. सभेत गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन बाहेरून लोक आणली होती. या सभेला महिलांना ३०० रुपये आणि पुरुषांना ५०० रुपये देऊन गर्दी केलेली होती. हे पैसे देऊन गोळा केलेली सभा होती'. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात कुठेही तथ्य नव्हतं. मुख्यमंत्री चिठ्ठ्या वाचून बोलत होते. असा आरोप खैरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर केला आहे.

तसेच, बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालला आहात, तर बाळासाहेबांनी शेवटी आदेश दिला होता की, माझ्या उद्धव आणि आदित्य यांना सांभाळा. मग हे त्यांनाच सोडून का चालले आहे ?, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात तुफान गर्दीत सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT