Chandrakant Patil-Vijay Wadettiwar e sakal
महाराष्ट्र बातम्या

वडेट्टीवारांकडून शिवरायांचा अपमान? उपाध्येंची टीका, पाटलांची सावध भूमिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवारांनी (Minister Vijay Wadettiwar) पुतळ्याच्या पायावर चढून छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला आहे. त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराजांचा अपमान केला, असा आरोप करत भाजप नेते केशव उपाध्ये (BJP Leader Keshav Upadhye) यांनी विजय वडेट्टीवारांचा निषेध नोंदवला आहे. मात्र, दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) सावध प्रतिक्रिया दिली.

अपमान करणारा माणूस हार का घालणार? -

वडेट्टीवारांचा व्हिडिओ व्हायरल झाला असेल तरी मी याप्रकरणात समतोल मांडेल. अशाप्रकारची घटना घडू याची काळजी सर्वांनी घ्यायला पाहिजे. पुतळे उंच असतात अशा ठिकाणी शिडी किंवा स्टूलची व्यवस्था करता येईल का? याचा विचार करायला पाहिजे. ही काळजी न घेणाऱ्या नेत्याचा निषेध केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. त्यामुळे केशव उपाध्याय यांनी निषेध केला आहे. यापूर्वी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील आमदाराने महाराजांच्या पुतळ्यावर चढून हार घातला होता. पण, दोन्ही घटनांमध्ये कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. अपमान करणारा माणूस हार का घालणार? त्यामुळे पुतळे तयार करताना विचार करायला पाहिजे.

केशव उपाध्ये काय म्हणाले? -

महाआघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप करत वडेट्टीवारांविरोधात काय कारवाई करणार? की सत्तेसाठी दुर्लक्ष करणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. तसेच या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

नेमकी काय आहे घटना? -

चंद्रपुरातील राजुरा येथे एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. त्याचा एका व्हिडिओ व्हायरल झाला असून पुतळ्याच्या पायावर चढून वडेट्टीवार महाराजांना हार घालताना दिसतात. त्यामुळे महाराजांचा अपमान केल्याची टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT