Chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil: "आपला कुठलाही देव बॅचलर नाही..." ;चंद्रकांत पाटील यांचं वादग्रस्त विधान

चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे राज्यात नव्या वादाला तोंड

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सध्या एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. आपला कुठलाही देव आणि महापुरुष बॅचलर नाही असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यातील नव्या वादाला तोडं फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Chandrakant Patil controversial statement Our all great personalities are bachelors)

पुण्यात राष्ट्रीय युवा दिवस निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी एक विधान केलं आहे ज्यामुळे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं नाही. परमेश्वराने कुठलाच भेद केला नाही.

सगळ्यांना कॉमन करुन त्याने पाठवलं. सगळ्यांना दोन डोळे दोन कान आणि समान शरीर देवाने दिले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

माणसाचा जन्म स्पर्मपासून होतो. स्पर्म दिसत देखील नाही. पण स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. त्यात माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कोणी तरी आहे ना? सगळी माणसे त्याने वेगळी बनवली आहेत. त्याच्या स्पर्ममध्ये त्याने काय व्हायचंय हे ठरवलेलं असते, असही चंद्रकांत पाटील म्हणाले.

....तर सगळ्यांची सुंता झाली असती

तुम्हाला मंदिरात जायला योग्य वाटतं त्या मंदिरात जा. तुम्हाला मस्जिदमध्ये नमाज पठण करायचं असेल तर ते करा. तुम्हाला आमचा विरोध नाही. हिंदू हा शब्द पूजेशी जोडला गेलेला नाही. हिंदू हा शब्द एक गुण वाचक आहे. आपल्या देशावर किती आक्रमण झाली.

अनेक मुस्लिम लोक आले. ते लुटायला आले. इंग्रज आले, डच आले, आपल्याला काय फरक पडला? आपला धर्म बुडाला का? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील हाल केले. पण त्यांनी देखील आपला धर्म सोडला नाही. त्यांच्यावर किती अत्याचार झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला धर्म वाचवला नाहीं तर सगळ्यांची सुंता झाली असती, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT