Chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

सोमय्या यांच्यावरील हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्राची सुरक्षा असतानाही किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत सोमय्या यांच्यावरील हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. घरात घुसू देणार नाहीत, नागपुरात फिरू देणार नाही, असे वक्तव्य करण्यात येत असल्याचे सांगत राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय? असा खोचक प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Chandrakant Patil Corner Maharashtra Government )

ते म्हणाले की, सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची (Attack On Somaiya In Pune) घटना घडली त्यावेळी सुट्टी होती, असे असताना देखील महापालिकेत एवढा जमाव कसा जमला? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पुणे महापालिकेत (PMC) असलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगडं मारण्याचे काम करू नये, असा टोमणा देखील शिवसेनेचे (Shivsena) नाव न घेता मारला आहे. 26 नोव्हेंबर 2019 ला विश्वास घात करून सत्तेत आलेल्या सरकारला 27 महिने होतील, या 27 महिन्यात अनेक उलथापालथ झाल्या, मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ठाकरे कुटुंबावर आरोप झाले पण कधी असे झाले नाही असे पाटील म्हणाले.

कोण आहेत हे देशमुख अनिल परब (Anil Parab) यांच्यावर आरोप करत आहेत. कोण आहेत परमबीर सिंग ज्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर आरोप केला. या सर्वांना धमक्या द्या असे म्हणत बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर गुडघे टेकायचे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर गुडघे टेकायचो, पण आता यांचे गुडघे टेकण्याचे चित्र बदलले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT