chandrakant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

'आमचे नाना लढले तर तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल?'

भाजपाचे उमेदवार नाना कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला मग मी लढलो तर..

सकाळ डिजिटल टीम

भाजपाचे उमेदवार नाना कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला मग मी लढलो तर..

आम्ही कोल्हापुर पोटनिवडणूक ही विकासावर लढलो आहे. देशात, राज्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये संधी मिळाली आहे. कोल्हापूरसाठी पालकमंत्र्यांनी काय केलं हे सांगावं, असा सवाल भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपाचे उमेदवार नाना कदम लढले तर विरोधकांच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल पहा असा अप्रत्यक्षरित्या टोलाही त्यांनी कॉंग्रेसला लगावला आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. हिंदुत्व हेच पुरोगामीत्व आहे. सावरकर हिंदुत्ववादी होते. ते विज्ञाननिष्ठ होते. आपल्या धर्माचं पालन करताना हिंदूंनी इतरांचा आदर केला पाहिजे. हिंदुत्व आमचा अजेंडा नाही तर श्वास आहे. इतर पक्षासारखी राजकीय गरज म्हणून ही भूमिका भाजपाने मांडलेली नाही. या मतांमध्ये 18 हजारांचा फरक पडला आहे. ही लढत तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी झाली आहे. आम्ही एकट्याने 77 हजार मते क्रॉस केली आहेत. भाजपाने सत्ताधाऱ्यांना तोंडाला फेस आणला आहे. ही अटीतटीची निवडणूक होती. हे देशाच्या लोकशाहीचे सौदंर्य आहे. भाजपानं नागरिकांनी दिलेला कौल मान्य केला आहे. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. दडपशाही, दंडुकेशही, जातीचा वापर या सगळ्याला न घाबरत त्यांनी काम केलं असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT