neelam gorhe-supriya sule-vidya chavan sakal
महाराष्ट्र बातम्या

'महाराष्ट्र रसातळाला गेलाय; सुळे, गोऱ्हेंसह चव्हाण गप्प का?'

भाग्यश्री राऊत

नागपूर : पुण्यात कबड्डीपटू अल्पवयीन मुलीची निघृण हत्या (pune minor girl murder) करण्यात आली. यामुळे संताप व्यक्त केला जात असून सरकारवर देखील टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp chandrakant patil) यांनी देखील राज्य सरकारवर आणि महिला नेत्यांवर टीका केली आहे. महिलांवरील अत्याचारांवर खासदार सुप्रिया सुळे, निलम गोऱ्हे, विद्या चव्हाण का गप्प आहेत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. आज ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात महिला सुरक्षित नाही. दिल्लीपेक्षाही महाराष्ट्र रसातळाला गेला आहे. घरातून बाहेर निघताना कोणालातरी सोबत घेतल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही. महिलांवरील अत्याचार वाढत गेले आहेत. फडणवीस सरकारमध्ये राज्यातील महिला सुरक्षित होत्या. मात्र, आता महिला सुरक्षित नाहीत. फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी नागपुरात पाकिटमारी झाली तरी त्याचा गाजावाजा व्हायचा. आता नितीन राऊत झोपा काढतात का? नागपुरात होणारे खून बलात्कार त्यांना दिसत नाहीत का? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.

दरम्यान, त्यांनी कोळसा टंचाईवरून देखील राज्य सरकारवर टीका केली. कोळसा टंचाईसाठी केंद्राकडे बोटे दाखविली जातात. मात्र, केंद्राने कोळशाच्या साठा करण्यास सांगितले होते. तो साठा राज्य सरकारने केला नाही. त्यामुळे राज्यात वीजचे संकट ओढावतेय, असेही पाटील म्हणाले.

पुण्यात नेमकं काय घडलं? -

कबड्डीपटू अल्पवयीन मुलगी कबड्डाचा सराव करताना आरोपीसह त्याचे साथीदार त्याठिकाणी आले. सराव करताना तिला बाहेर ओढले आणि तिच्या गळ्यावर सपासप वार केले. आरोपीच्या मित्रांनी देखील कोयत्याने तिच्यावर वार केले. यामध्ये तिचे शीर धडापासून वेगळे झाले होते. या घटनेमुळे पुणे हादरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT