chandrakant patil
chandrakant patil  sakal
महाराष्ट्र

'लाथ मारायची अन् सॉरी म्हणायचं ..'; चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका

सकाळ डिजिटल टीम

राज्यात हनुमान चालिसा पठण यावरून राजकारण तापलेले असताना मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजप पक्षातून कोणीही उपस्थित राहीले नाही याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात राष्ट्रपती लावण्याबाबत राज्यपाल ठरवतात, आम्ही कुठली मागणी धरली नाही असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप कर पोलीस स्टेशन समोर आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होतो, फुटेज तपासल्यानंतर पोलीस या निष्कर्षापर्यंत आले आहेत, हे पोलिसांच्या समोर झालं असल्याचे म्हटले आहे.

तसेच आजच्या सर्वपक्षीय बैठकीला भाजपकडून कोणीही गेलं नाही यावर बोलताना ते म्हणाले की, "सर्वपक्षिय बैठकीला आम्ही जाणार नाही. सर्वांनी एकत्र बसून चर्चा करू, निर्णय घेऊ असं वातावरण माहाविकास आघाडी सरकारने ठेवलं नाही, लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचं अशी वृत्ती महाविकास आघाडीची आहे. तीन दिलस सलग नेत्याच्या गाड्यांवर दगड फेकायची आणि मग म्हणायचं एकत्र बसून चर्चा करू, त्यांना जे करायचं ते करू दे" असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. सोबतच त्यांनी भाजप लोकांमध्ये प्रबोधन करत आहे. पोलखोल सभा सुरू आहेत, त्याचा शेवट विक्रमी होईल की महाविकास आघाडी बघत राहील असेही सांगितले.

काही झालं की केंद्र, तुम्हीच राष्ट्रपती राजवटीची स्थिती निर्माण करत आहात असे ते यावेळी म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीत दिलीप वळसे पाटील यांना मुंबईत काही निर्णय घेण्याचा अधिकार आहे? असा सवाल त्यांनी केला. सर्व पक्षांनी एकत्र येत तोडगा काढण्याबाबत ते म्हणाले की, "एकत्रित बसण्यामध्ये सिरीअसनेस दिसला पाहिजे, मुख्यमंत्री बैठकीला येणार नाहीत. या राज्यात पन्नास वर्ष राजकारण केलं, ज्यांच्या शब्दाला वजन आहे ते येणार नाहीत, मग कोण येणार तर दिलीप वळसे पाटील, त्यांना मुंबईत निर्णय घेण्यात काही अधिकार आहे? दिलीप वळसे पाटील बिचारे आहेत. मुंबईचे निर्णय मातोश्रीवरून होणार मग, ज्या बैठकीत फक्त चहा बिस्कीटं खाल्ली जाणार तिथं जाण्याचं काही कारण नाही" असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT