Chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil : ग्रंथालयांच्या दर्जावाढीसाठी प्रयत्न;मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन,अनुदानात ६० टक्के वाढ

राज्यातील ग्रंथालयांची दर्जावाढ करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून राज्यात ग्रंथालये वाढविण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करीत असल्याचे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील ग्रंथालयांची दर्जावाढ करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून राज्यात ग्रंथालये वाढविण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करीत असल्याचे उत्तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्याचबरोबरच या सर्व ग्रंथालयांना या सरकारने ६० टक्के अनुदान वाढवले आहे. त्यात आणखी ४० टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्यात ‘गाव तेथे वाचनालय’ ही चळवळ राबविण्यात आल्यापासून ग्रंथालयांची दर्जा वाढ करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा, असा प्रश्न सदस्य अरुण लाड यांनी विधानपरिषदेत नियम ९२ अन्वये उपस्थित केला होता. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, दादर मुंबई मराठी ग्रंथालय व अमरावतीतील ग्रंथालयासारखी जुनी ग्रंथालये आहेत. त्यांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. राज्यातील जुन्या व ऐतिहासिक ग्रंथालयांच्या इमारती दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून यावर निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य किशोर दराडे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

त्यास उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील सर्व ग्रंथालयाची ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ दर्जाची तसेच ग्रंथालय आनुषंगिक माहिती असलेले १६ प्रश्नांची माहिती भरण्याची कार्यवाही विभागाकडून सुरू आहे. यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. ही माहिती पूर्ण भरून झाली की सहा महिन्यांत निर्णय घेऊ.

आदिवासी भागांतही ग्रंथालये

ग्रंथालये जिल्हा नियोजन निधीमधून तसेच आमदार निधीतूनदेखील पुस्तके खरेदी करू शकतात. तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांत आणि आदिवासी भागातही नवीन ग्रंथालये सुरू होतील. त्यामुळे नव्याने ग्रंथालयांची संख्याही वाढेल, असेही मंत्री पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT