chandrakant patil on President Rule in Maharashtra criticized mva govt shivsena over hanuman chalisa
chandrakant patil on President Rule in Maharashtra criticized mva govt shivsena over hanuman chalisa  sakal
महाराष्ट्र

'मागणी आम्ही लावून धरणार नाही, पण…'; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

हनुमान चालिसा पठणावरून शिवसेना (Shivsena) आणि राणा दाम्पत्य याच्यात वाद चांगलाच पेटला आहे, मातोश्री समोर हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण करण्यावर राणा दाम्पत्य ठाम असून त्याना रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत,या प्रकरणात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत, राणा दाम्पत्याची मागणी हनुमान चालिसा वाचायची आहे, राक्षसस्तोत्र नाही, असा खोचक टोला देखील लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी सलग केलेल्या ट्विट्सत्या मालिकेत राज सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "राज्याचे गृहमंत्री सांगताहेत की, राज्यात कायदा सुव्यस्था बिघडली आहे. मग तुम्ही काय चपात्या भाजताय? जमत नसेल तर राजीनामा द्या, शिवसेना बसलीच आहे आपला गृहमंत्री बसवायला. स्वतः काम करायचंच नाही आणि जे काही होईल त्याचं खापर कधी मनसेवर कधी आमच्यावर फोडायचं, असा या सरकारचा कारभार आहे!" असे देखील त्यांनी सांगितले आहे.

हनुमान चालिसा वाचायचीय, राक्षसस्तोत्र नाही..

चंद्रकांत पाटील यांनी रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या पाठराखण करत, "राणा दाम्पत्याची मागणी शिवसेनेला मान्य नाही. त्यांना हनुमान चालिसा वाचायची आहे, राक्षसस्तोत्र नाही" अशी खोचक टिका त्यांनी केलीय, तसेच पुढे त्यांनी "ठीक आहे, त्यांना हनुमान चालिसाही वाचू द्यायची नाही, तर पोलिसांद्वारे रोखा. शिवसैनिकांनी रस्त्यावर का यावं? कारवाईत पोलिस कमी पडताहेत का? की सरकारला राज्य चालवता येत नाहीये?" असे सवाल करत राज्यातील प्रशसकीय यंत्रंणा आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सैनिक रयतेचे रक्षण करण्यासाठी असतो त्यांच्यावरच हात उचलणाऱ्यांना सैनिक म्हणायचं का? असा सवाल देखील त्यांनी शिवसेनिकांना केला आहे, त्यांनी लिहिलं की, "परकीय आक्रमकांची निशाण तोडणारे शिवसैनिकांचे हात आता स्वकीयांवरच हल्ले करताहेत! अरेरे... किती ही अधोगती!! यांना सैनिक कसं म्हणायचं? सैनिक रयतेचं रक्षण करण्यासाठी असतो. मग जनतेवरच हात उचलणाऱ्या सैनिकांना जरब बसेल अशी कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदा-सुव्यवस्था राखणार का?"

राष्ट्रपती राजवटीचं काय?

चंद्रकांत पाटील यांंनी पुढे नुकत्याच झालेल्या कोल्हापूर विधानसभा पोट निवडणूकीचा संदर्भ देत, कोल्हापूर निवडणुकीतील दडपशाही, आता मातोश्रीसमोर हनुमान चालिसा प्रकरणावरून मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला, या सर्व गोष्टी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा कडेलोट झाल्याचे पुरावेच असल्याचे म्हटले आहे, तसेच "विरोधात बोलायचं नाही, आम्ही करू तेच बरोबर असा मविआचा कारभार चाललाय. ही दडपशाही सहन करणार नाही!" असे बाजवले.

यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, "राज्यातील सध्याची परीस्थिती पाहता कुणीही म्हणेल की, या सरकारला राज्य चालवता येत नाही. जी जनतेची भावना आहे तीच आमचीही भावना आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी आम्ही लावून धरणार नाही, पण परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यपाल योग्य तो अहवाल राष्ट्रपतींना पाठवतीलच, याची आम्हाला खात्री आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: लखनौ - दिल्लीमध्ये अटीतटीचा सामना! केएल राहुलने जिंकला टॉस, पाहा दोन्ही संघांचे प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT