चंद्रकांत पाटील इसकाळ
महाराष्ट्र बातम्या

"जब होगी किताब तब नही चलेगा हिजाब!" - चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून सुरु असलेला हिजाब वादावर (Hijab Row) कर्नाटक उच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. कोर्टाने हिजाबविरोधातील याचिका फेटाळल्या असून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी (Karnataka High Hijab Judgement) योग्यच असल्याचं मत न्यायालयानं मांडलं आहे. यानंतर देशभरातून प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत. या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये कोर्टाचा हिजाब बंदीचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी 'जब होगी किताब तब नही चलेगा हिजाब!' म्हणत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, त्यांनी मागील काही दिवसांपासून देशात हिजाब या विषयाला हाताशी धरत समाजकंटकांकडून धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज याच विषयात निर्णय देताना कर्नाटक हायकोर्टाने हिजाब हा इस्लामचा मुख्य पेहराव नसल्याचे म्हणत सर्व याचिका फेटाळल्या आहेत असे सांगितले.

हिजाब प्रकरणाचे राजकारण करत स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या राजकरण्यांना हा न्यायालायाची चपराक असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, "मुस्लिम समाजातील तरुणांची माथी भडकवून स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या त्या समाजातील पुढाऱ्यांना आणि अनेक राजकीय पक्षांना ही मोठी चपराक आहे. महाराष्ट्रातही मविआ सरकारच्या मदतीने काही संघटना हे प्रकरण तापवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे निंदनीय आहे." असे ते म्हणाले.

मुस्लिम समाजातील नागरिकांना चंद्रकात पाटील यांनी एक अवाहन देखील केले आे शैक्षणिक संस्थांमध्ये कोर्टाचा हिजाब बंदीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत त्यांना सांगितले की, "यानिमित्ताने मुस्लिम समाजाला माझा आग्रह आहे की, मुस्लिम समाजातील जर कोणी व्यक्ती बेकायदेशीर, असंवैधानिक किंवा देशविरोधी कृत्य करत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर राहा!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: १५ वर्षांनंतर बंगालमध्ये घडणार मोठा राजकीय उलटफेर? भाजपची १६० जागांवर आघाडी

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

AC vs Cooler vs Fan : एसी, कूलर की पंखा...उन्हाळ्यात काय आहे बेस्ट? महिन्याला किती बिल येतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT