Chandrakant Patil Google
महाराष्ट्र बातम्या

'राणेंची वेगळी शैली, पण केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही'

भाग्यश्री राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणावर टीका करताना केंद्रीय नारायण राणे यांचा तोल ढासळला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी भाजप-शिवसेना आमनेसामने येताना दिसत आहे. त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

भाजपची भूमिका स्पष्ट करताना पाटील म्हणाले, ''केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही. देशाच्या शिष्टाचाराच्या दृष्टीने विचार केल्यास केंद्रीय मंत्री हे '७ अ' या गटात मोडतात. त्यांना अशाप्रकारे कुठलंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. नारायण राणेंना अटकचे आदेश केवळ सत्तेचा दुरुपयोग करून काढले आहेत. या सरकारला कोण सल्लागार मिळतात माहिती नाही. सर्व प्रकरणात न्यायालयात दणका मिळाला, अगदी त्याचप्रमाणे या प्रकरणात देखील न्यायालयात दणका मिळेल.''

नारायण राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ''मी या वक्तव्याचे समर्थन करत नाही. राणेंची एक वेगळी शैली आहे. त्यामधून हा आक्षेपार्ह शब्द आला असेल. त्यामुळे त्यांना थेट अटक करणे चुकीचे आहे. त्यांना आधी समन्स द्यायला पाहिजे होता. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मोदी पंतप्रधान असताना चोर म्हणाले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाषण केले त्यावर तक्रारी दाखल करा.''

गेल्या या २० महिन्यात राज्यात सूडबुद्धीने राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्रातलं राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. आता मात्र ते दिसत नाही. त्यावर सर्व पक्षांच्या प्रमुखाने विचार करणे गरजेचे आहे. विधानपरिषदेच्या निलम गोऱ्हे या कशाच्या आधारावर बोलतात. त्या विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. त्या एका पक्षाची भूमिका घेऊन बोलू शकत नाही. तसेच संजय राठोडांचं काय झालं? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाची तोडफोड केली यावरही त्यांनी भाष्य केले. हा हल्ला फक्त भ्याडपणाचं लक्षण असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT