chandrakant Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrakant Patil: 'चंद्रकांत पाटलांनी तसं बोलायला नको होतं', त्या व्यक्तव्यावरून भाजपमध्ये उघड नाराजी

चंद्रकांत पाटलांच्या बाबरी मशीदीच्या वक्तव्यावर भाजपचा सावध पवित्रा

अंकिता खाणे (Ankita Khane)

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांच्या व्यक्तव्यानंतर भाजपमध्ये उघड नाराजी दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी असं बोलायला नको होतं असं वक्तव्य मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे वैयक्‍तिक मत असल्याच मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.

प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार बोलताना म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचं मत हे वैयक्‍तिक आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या बाबतीत भाजप कधीच काही बोलले नाही. बाबरी मशीद पाडण्याची समस्त हिंदू धर्माची मागणी होती. चंद्रकांत पाटील यांनी तसं बोलायला नको होतं. तर त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केलं आहे. बाबरी मशीद पाडण्यात तुमच काय योगदान आहे असा सवलही शेलार यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर भाजपची जाहीर नाराजी दिसून येत आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपमध्ये एकमत नसल्याचंही दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर भाजपला याचा फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता भाजपने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, त्यात शिवसैनिक नसल्याचे वक्तव्य करून त्यावर सारवासारव करणारे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेपासून भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. ‘पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले असून, ती पक्षाची भूमिका नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा मोठा भाग होता, असेही बावनकुळे यांनी माध्यमांपुढे जाहीर केले. भाजपने आपली भूमिका उघडपणे सांगितल्याने पाटील हे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT