Ajit-Pawar
Ajit-Pawar 
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांनी सरकारची काळजी करू नये - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांना झालेले दु:ख मी समजू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारबाबत त्यांनी फार काही काळजी करू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाटील यांना शुक्रवारी दिला. तेव्हाच, ‘कावळ्याच्या शापाने काय मरत नाही’, अशा शब्दांत पवार यांनी पाटील यांना टोला लगावला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजिलेल्या क्रीडा स्पर्धांचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद देऊ नये, अन्यथा मातोश्रीबाहेरच कॅमेरे लागतील, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध राहावे, असा सल्ला पाटील यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळात कुणाला संधी द्यायची याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते घेतील. मंत्रिमंडळाचा विस्तार ठरल्याप्रमाणे होईल. त्यात राष्ट्रवादीला आणखी एक महत्त्वाचे खाते मिळेल, याबाबत विश्‍वास आहे. कर्जमाफी नव्या सरकारने केल्याचे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे कुणी श्रेय घेण्याचा प्रश्‍न येत नाही. यासंदर्भात आमच्यात कोणताही वाद नाही. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहे.’’ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर बोलण्यास पवार यांनी नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

ICC Ranking: वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताकडून हिसकावलं कसोटीचं सिंहासन; पण वनडे - टी20 मध्ये रोहितसेनाच अव्वल

Dharmendra And Hema Malini: 44 वर्षानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी पुन्हा केलं लग्न? रोमँटिक फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT