toilet
toilet 
महाराष्ट्र

राज्य महामार्गांवर लवकरच 160 ठिकाणी स्वच्छतागृहे 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या महामार्गावर प्रवाशांच्या सोईसाठी 160 ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात येणार आहेत. त्यांची माहिती गुगल मॅपसारख्या ऍपवरही देण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने वर्षा पवार-तावडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात पाटील यांची भेट घेतली. या वेळी शिष्टमंडळाने राज्यातील प्रमुख महामार्गांवर स्वच्छतागृहांची उभारणी करावी, यासह महिला प्रवाशांच्यादृष्टीने आवश्‍यक असलेल्या सुविधांच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. 

महिला प्रवाशांसाठी महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स व्हेडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर ठेवण्याच्या मागणीचा यामध्ये समावेश होता. पाटील यांनी ही मागणी मान्य करत, महामार्गावरील स्वच्छतागृहांमध्ये याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. 

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, उपसचिव पी. के. इंगोले, संघटनेच्या उपाध्यक्षा सीमा देशपांडे, मुंबई विभागाच्या सचिव सुरेखा किणगावकर, अर्चना बक्षी, मंजू नायर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT