Chandrkant Patil Esakal
महाराष्ट्र बातम्या

105 नगरपंचायत निवडणुकीसाठी चंद्रकांतदादांची मोर्चेबांधणीला सुरवात

राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव केला सुरु ; चंद्रकांत पाटील

पोपट पाटील

इस्लामपूर (सांगली) : भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने पडण्याची भीती न बाळगता निवडणूक लढवली पाहिजे. कधी काळी पक्षाची अवस्था बिकट होती. त्यावेळी विरोधकांनी नारा केला होता" अरे अरे मुकुंदा पडशील कितींदा ". परंतु आज भारतीय जनता पार्टी पक्ष एक नंबरला पोहोचला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात पक्ष मजबूत झाला आहे. असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी केले. जिल्हा सह. बँक निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या सत्कार प्रसंगी पेठ ( ता. वाळवा ) (Walwa)येथे ते बोलत होते.

लोकल नेत्यांना राजकारणात महत्व द्या. जिल्हा बँक निवडणुकी सारखेच धोरण इतर आगामी येणाऱ्या निवडणुकीत ठेवा.

ते म्हणाले, "राजकरणात आपल्याला हवे तसे घडतेच असे नाही. उलट जे घडते ते फायद्याचे ठरते. पोटनिवडणुकीत आगामी काळात येणाऱ्या राज्यातील १०५ नगर पंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवायच्या आहेत. काही ठिकाणी आवश्यकता वाटल्यास जिल्हा अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षाशी बोलून निर्णय घ्यावा. त्याठिकाणी लोकल नेत्यांना राजकारणात महत्व द्यावे. जिल्हा बँक निवडणुकी (Bank Election 2021) सारखेच धोरण इतर आगामी येणाऱ्या निवडणुकीत ठेवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. झालेल्या निवडणुकीत काय चुका झाल्या, कोणी फसवले हे लक्षात ठेऊन पुढील निवडणूक लढवायची आहे. आता तयार रहा."

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले," जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची झाली. आठ जागांची अपेक्षा होती. परंतु चार जागा मिळाल्या. आमचा फाजील आत्मविश्वास नडला. काही चुका झाल्या त्या पुढे सुधारू. विरोधक एक संघ होऊन लढले तरी आम्ही चार जागा घेतल्याच. पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांचे चांगले नियोजन केले आहे. यश नक्की घेऊ."

माजी मंत्री शिजीराव नाईक म्हणाले, " भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करतात. या निवडणुकीत त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. कोअर कमिटीला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास मुभा दिल्याने यश संपादन झाले. "

सम्राट महाडिक म्हणाले, " भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनल जिल्हा बँक निवडणुकीत पाठीशी उभा राहिले. याचे नियोजन लवकर झाले असते तर जिल्हा बँकेत भाजपचीच सत्ता आली असती. येणाऱ्या निवडणुकीला वातावरण चांगले आहे. भाजप पक्षाला यश संपादन होणार. "

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख, राहुल महाडिक,सी. बी पाटील, बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, नगरसेवक अमित ओसवाल, कपिल ओसवाल, सतीश महाडिक, विक्रम पाटील, चेतन शिंदे, जयराज पाटील उपस्थित होते.

"शिवसेनेने आपल्या मुख्यमंत्री पदापायी आपला पक्ष संपवण्याचे ठरवले आहे. ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची सारखी अधूनमधून चेक करत आहेत ' ती मजबूत आहे का नाही.' नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणच्या पोट निवडणुकित भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपचे - २३ , काँग्रेस -१७, राष्ट्रवादी कॉँग्रेस - १७, शिवसेना - १२ उमेदवार निवडून आले आहेत. गावोगावी राष्ट्रवादीने शिवसेनेचा पाडाव सुरु केला आहे."

चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT