महाराष्ट्र बातम्या

PM Modi Pune Visit: पुण्यातील ‘मेट्रो ’ हा देशाच्या यशकथेचाच एक भाग, नरेंद्र मोदी विकासदृष्टीचे अजोड नेतृत्व

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांना जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या नव्या मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) होत आहे.

चंद्रकांत पाटील

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांना जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या नव्या मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (मंगळवार) होत आहे. याशिवाय, लोककल्याणकारी योजना आणि विविध प्रकल्पांचे उद्‍घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नेतृत्वाने आपल्या नागरिकांच्या हिताचा अहोरात्र विचार करण्याचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे, असे एक कार्यकर्ता म्हणून मला वाटते.

नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा करिष्मा २०१४ पासून अबाधित आहे. देशाला सर्व क्षेत्रात अव्वल बनविण्यासाठी ते स्वतः विचार करत असतात. सहकाऱ्यांना प्रेरणा देवून सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहितही करतात. त्यामुळेच, नव्या भारताच्या उभारणीत देशातील प्रत्येक नागरिक स्वतःला झोकून देत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. याचा परिणाम म्हणून ‘स्वच्छ भारत’ हे प्रत्येक नागरिकाचे मिशन बनले.

‘आत्मनिर्भर भारत’ हे प्रत्येक उद्यमशील नागरिकाचे स्वप्न बनले आहे. ‘स्टार्टअप इंडिया’ भारतीय तरूणांच्या भविष्याला उद्योजकतेची, रोजगारक्षम बनविण्याची गुरुकिल्ली बनली. ‘मन की बात’ कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाला हात घालणारी ठरली. प्रत्येक भारतीयासाठी ‘जी- २०’ अभिमानाचा विषय बनला. जनतेशी बांधिलकी जपणाऱ्या मोदींच्या कार्यशैलीकडे जग आज अचंब्याने पाहात आहे.

नव्या भारताच्या उभारणीत सर्व वयोगटातील सहभाग दिसतो. शेती, उत्पादन उद्योग, सेवा उद्योग, स्वयंरोजगार अशा विविध क्षेत्रांतील नागरिक या उभारणीत सहभागी आहेत. खतांच्या उत्पादनामध्ये भारत स्वयंपूर्ण होतो आहे. भारतात २०१३-१४ मध्ये ३८०.४६ लाख मेट्रिक टन खतांचे उत्पादन होत होते. ते यंदा जुलैमध्ये ४८५.२९ लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचले आहे. भारतातील ‘मोबाईल फोन’ क्रांतीची चर्चा जगभरात होते आहे.

देशातील ६६ टक्के जनतेपर्यंत स्मार्टफोन पोहोचला आहे. त्याद्वारे डिजिटल पेमेंट करण्यामध्ये भारत जगातील अव्वल क्रमांकाचा देश बनला. भारतीयांनी निर्यातीत केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. २०१४ मध्ये ४४६ बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी निर्यात होती. ती ७४ टक्क्यांनी वाढून ७७६ बिलियन अमेरिकी डॉलर्स झाली. भारतातून वर्षाकाठी ६८,६०५ कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात केले जातात.

हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा असलेल्या भारताने एकविसाव्या शतकातील जगाचे नेतृत्व केले पाहिजे, हे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष्य आहे. त्या दिशेने प्रत्येक भारतीयाची पावले दमदारपणे पडत आहेत. पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे, हा पंतप्रधानांचा आग्रह आहे. पुन्हा मेट्रोचे उदाहरण पाहू. २०१४ पर्यंत भारतात मेट्रो केवळ २४८ किलोमीटरचे जाळे उभी करू शकली होती. आज हे जाळे तब्बल ८६० किलोमीटरपर्यंत विस्तारले आहे.

केवळ ठराविक महानगरांतच नव्हे तर देशाच्या विविध भागातील शहरांत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. पुण्यातील ‘मेट्रो प्रकल्प’ हा देशाच्या विकासाच्या यशकथेचाच एक भाग आहे. कोरोनाकाळात पंतप्रधानांनी देशाला सावरताना जगाचाही विचार केला. कोरोनावरील लसीकरणात भारताने केलेल्या कामगिरीने जग आश्चर्याने थक्क झाले. यात पुण्याचे योगदान मोठे होते. पंतप्रधानांनी स्वतः पुण्यात येऊन या लस उत्पादनाची पाहणी केली होती.

पुणे होणार जागतिक कीर्तीचे महानगर

पंतप्रधान मोदी यांनी जगामध्ये विश्वबंधुत्वाचा भाव जागविला. भारताची संस्कृती, वारसा अभिमानाने मिरवायला हवा, यासाठी ते आग्रही आहेत. या देशात प्रत्येक कुटुंबाला घर हवे, नळाद्वारे पाणी हवे, वीजपुरवठा हवा, प्रत्येक मुला-मुलीला शिक्षण मिळायला हवे आणि हातांना रोजगार अशी मोदी यांची दृष्टी आहे.

भारताचे भविष्य उज्ज्वल आहे; कारण या देशाला निकडीच्या काळात अजोड नेता मिळाला आहे. त्यामुळे, आजचा भारत प्रगतीची घोडदौड करतो आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने पुण्यातील अनेक प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांची आखणी दीर्घकालीन विकासाच्या दृष्टिकोनातून झाली आहे. उद्याच्या जगातील आव्हानांना सामोर जाणारे जागतिक कीर्तीचे महानगर पुणे असणार आहे, याची खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Scam: ‘वॉटर बिल अपडेट करा अन्यथा पाणी बंद’ अशा धमकीने; उद्योजकाला ५४ लाखांचा गंडा

CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन

Illegal Sand Mining: सुखना नदीतून वाळू उपसा करणारे जेरबंद; पाचजणांवर गुन्हा; पाच ट्रॅक्टरसह तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

Manmad News : इंदूर-पुणे महामार्गावर कंटेनर अपघात; मनमाडजवळ वाहतुकीचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Updates : मराठा आंदोलक जरांगे पाटील बैठकीसाठी बीडला रवाना

SCROLL FOR NEXT