Balu Dhanorkar Passed Away esakal
महाराष्ट्र बातम्या

Balu Dhanorkar Passed Away : 'या' आजारामुळे झाला बाळू धानोरकर यांचा मृत्यू, ८ वर्षांपूर्वी झाली स्थुलतेची शस्त्रक्रिया

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अंकिता खाणे (Ankita Khane)

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झालं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु, उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 2014 मध्ये ते आमदार असताना त्यांच्यावर स्थुलतेसंबधीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही पथ्ये पाळावे लागतात. आतड्यामध्ये गुंतागुंत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं कारण समोर येत आहे.

नागपुरात शुक्रवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांचे किडनी स्टोनचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर आतडयात इंफेक्शन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. खासदार बाळू धानोकर यांच्या पार्थिवावर वरोरा येथे उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहीती आहे.

मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले.

दरम्यान चार दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी खासदार धानोरकर यांच्यावर नागपुरमध्ये उपचार सुरू होते. पिता-पुत्राच्या मृत्यूमुळे धानोरकर कुटुंबीयांवर मोठं दुःख कोसळलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT