chandrashekhar bavankule esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bavankule: राज्यपालांच्या वक्तव्याने शिवरायांच्या प्रतिमेला धक्का नाही; बावनकुळेंनी केले समर्थन

कोण म्हणतो, राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपुर्वीच भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळाचे आदर्श आहेत . असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. तर राज्यापालांना राज्याबाहेर हाकलून दिलं पाहिजे. अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यापालांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. राज्यापाल कोश्यारी यांनी शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे म्हटलं आहे.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर संभाजीराजे, उदयनराजे भोसले, संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर नाही ,त्यांना राज्याबाहेर हाकलुन दिले पाहिजे, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता .

आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यापालांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "कोण म्हणतं राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का बसेल, असं कोणतही वक्तव्य केलं नाही, कारण भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता शिवरायांच्या आदेशापासून प्रेरणा घेऊन काम करतो" तर ते पुढे म्हणाले,

"राज्यपाल ज्या दिवसापासून महाराष्ट्रात आले, त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे विषय आले आहेत, ते राज्यपालांनी संवेदनशीलपणे हाताळले आहेत . शिवनेरी गडावरही राज्यपाल जाऊन आले आहेत. राज्यपालांनी कधीही शिवरायांच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न केला नाही, करु शकत नाहीत" असं बावनकुळेंनी म्हटलं आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT