Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: "..तर जोडे खाल!" फडणवीसांच्या मदतीला धावून आले बावनकुळे, उद्धव ठाकरेंवर जहरी टिका

फडणवीस हे मेहनतीने पुढे आले, तर सर्वात कलंकीत मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे बावनकुळेंची जहरी टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात फडणवीस हे एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही, असं म्हणताना दिसत आहेत. ही क्लिप ऐकवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांच्या या व्यक्तव्यानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संतापाची लाट उसळली आहे. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेली ही टीका भाजपच्या नेत्यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

''उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय महाराष्ट्राच्या गप्पा मारणार आहे. आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांचे काय कर्तृत्व आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं अनुभवलं आहे. आणि तुम्ही किती कर्तृत्वशून्य आहात हे देखील तुमच्या सत्तेच्या अडीच वर्षांत लोकांनी अनुभवलं आहे” अशी खोचक टीका केली.(Latest Marathi News)

शून्य कर्तुत्व असलेले उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता त्यांना उत्तर देत आहेत असंही बावनकुळे यावेळी म्हणालेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात तुलना करत देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द समोर मांडली आहे. उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व शून्य आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

फडणवीस 29व्या वर्षी आमदार होते, तर ते 31व्या वर्षी राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. तेव्हा माझे वडील आणि माझा कॅमेरा हे ठाकरे यांचं कर्तुत्व होतं. 43 व्या वर्षी उद्धव ठाकरे माझे वडील, माझी पत्नी आणि माझा कॅमेरा असे कर्तुत्व झाले. 60 व्या वर्षी त्यांचं कर्तुत्व मी माझा मुलगा, मंत्री, पत्नी आणि मुख्यमंत्री असं झालं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा जीवनपट घेतला तर शून्य अस्तित्व आणि कर्तुत्व असणारा व्यक्ती उद्धव ठाकरे आहे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

तर 'पुन्हा असं वक्तव्य केल्यास नागपूरची जनता जोड्याने मारेल. तर आता ठरलं आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बोलले त्या त्या ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात येतील. कालच हे ठरलं होतं. पण आता यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात जोडे खायचे असतील तर तुम्ही पुन्हा हे बोलून बघा', असंही बावनकुळे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर जिद्द, मेहनत आणि सतात्याच्या जोरावर नगरसेवक ते मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आणि आता उपमुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास आहे, तर मुख्यमंत्री पदाचा अयशस्वी प्रवास म्हणजे उद्धव ठाकरे आहे, अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT