Chandrashekhar Bawankule sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला ;बावनकुळे,राज्य निवडणूक आयुक्तांना विनंती

अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राज्यातल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे राज्यातल्या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आज राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्याशी त्यांनी याबाबत चर्चा केली तर सचिव सुरेश काकाणी व राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांचीही भेट घेतली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने पुढे जात आहेत. पोटनिवडणुकांसाठी नुकताच निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता या निवडणुका पावसाळा संपल्यानंतर घेण्यात याव्या, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे.

निवडणूक आयोगाने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या ११ नगर परिषदांमधील ११ प्रभाग व हातकणंगले नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी १२ ऑगस्ट २०२४ रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

या सर्व पोटनिवडणुका ग्रामीण भागाशी संबंधित आहेत. पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तसेच अतिवृष्टीचे सावट असल्याने सध्या निवडणुका टाळणे योग्य ठरेल, अशी विनंती बावनकुळे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT