chandrashekhar bawankule sakal
महाराष्ट्र बातम्या

Chandrashekhar Bawankule : विधानसभेत दोनशे जागा जिंकणार

राज्यात मोठा पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये मोठे विधान केले.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - राज्यात मोठा पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये मोठे विधान केले. ते म्हणाले, एक निवडणूक हरल्याने फरक पडत नसतो. आम्ही पुन्हा काम करू आणि राज्यात महायुतीची सत्ता स्थापन करू.

जातीपातीच्या राजकारणाने भाजपचा घात केला. संविधान बदलणार असल्याची खोटी भीती जनतेला दाखवण्यात आली. जात पात लोक सोडतील आणि राज्यात आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वासही बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

बावनकुळे म्हणाले, मोदी यांचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. संविधान बदलणार अशा थापा मारल्या. जनतेला भ्रमित केले. अपप्रचारावर त्यांचा भर होता. महाराष्ट्रात विरोधकांचे जातीयवादी राजकारण जिंकले. इंडिया आघाडीने खोटे बोलून मत घेतले. एकदा जनता भ्रमित झाली. ती वारंवार होत नसते. याची प्रचीती आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला येईल.

आम्ही जिंकत होतो तेव्हा ईव्हीएममुळे जिंकतो, असे विरोधक दावे करीत होते. आता तेच जिंकले आहे. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा त्यांनी बाजूला ठेवला. इंडिया आघाडीने इतक्या खटपटी करूनही त्यांना मोदी यांचा पराभव करता आला नाही. मोदींच्या नेतृत्वातील एनडीए जिंकले आहे.

मोदी हेच देशाचे नेते आहेत आणि पंतप्रधान होणार आहेत. मतदानाच्या टक्केवारीतसुद्धा आम्ही पुढे आहे. काही जागा आम्ही कमी मतांनी हरलो. मागील वेळीच्या तुलनेत यावेळी मताधिक्य वाढले असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड काम केले. राज्याचा विकास केला. सर्व गोरगरीब जनतेला लाभ मिळवून दिला. मात्र जातीपातीच्या राजकारणामुळे ते दुखावले गेले. फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी आम्ही सर्वांनी विनंती केली आहे. त्यांना छळण्यात येत असल्याने वाईट वाटते. महाविकास आघाडीचा विजय कट कारस्थान, शकुनी नीतीचा असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT