Chandrayaan-3 Landed 
महाराष्ट्र बातम्या

Chandrayaan-3 Landed: चांद्रयान-३ चं यशस्वी लँडिंग महासत्तेकडे जाण्याचं पहिलं पाऊल, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया!

Sandip Kapde

Chandrayaan-3 Landed: चांद्रयान-3 चे लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले. यासह चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत रशिया, अमेरिका आणि चीननंतर जगातील चौथा देश बनला आहे. त्याच वेळी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा हा जगातील पहिला देश बनला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आहे. भारतीयांसाठी हा आनंदाचा दिवस आहे. गौरवाचा दिवस आहे. चांद्रयान-३ हे अभियान यशस्वी करण्यासाठी इस्त्रो आणि आपले शास्त्रज्ञ यांनी मोठी मेहनत घेतली.

एकनाथ शिंदे म्हणाले, जगाचे भारताकडे लक्ष होते. दक्षिण ध्रृवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील अभिनंदन केले पाहीजे. नरेंद्र मोदी यांनी पाठबळ पुरवण्याचे काम केले. आज आपला देश महासत्तेकडे जात आहे. महासत्तेकडे जात असताना चांद्रयान -३ चं यशस्वी लँडिंग पहिलं पाऊल आहे. 

नरेंद्र मोदी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मी ब्रिक्समध्ये आहे. पण आता प्रत्येक भारतीयासारखं माझं मनही चांद्रयान-३ मध्ये गुंतलेलं आहे. मी खूप आनंदी आहे. देशवासियांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे.

मी इस्त्रो, देशातल्या सर्व शास्त्रज्ञांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो. १४० जनतेला कोटी कोटी धन्यवाद देतो, असे मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT