SHARAD PAWAR ISRO ESAKAL
महाराष्ट्र बातम्या

Chandrayan-3: 'पंडित नेहरुंच्या प्रयत्नांचं आज चीज झालं'; शरद पवारांकडून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन

सकाळ डिजिटल टीम

Chandrayan-3 landed successfully on moon

मुंबई- चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्याने संपूर्ण भारत आनंद साजरा करत आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील नेहरू तारांगण येथे चांद्रयान-3 लँडिंग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. शरद पवार यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत त्यांच्यामुळे हे शक्य झाल्याचं ते म्हणाले.

नेहरू तारांगण येथून मला हा क्षण पाहायला मिळाला याचा आनंद आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरुवातीच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश पुढे जावा यासाठी इस्त्रोसह अन्य संस्थांची स्थापना केली. त्यांनी जे प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांचे आज चीज झाल्याचं मला वाटतं. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी जगाला दाखवलं की, भारत एक पुढे जाणारा देश आहे, असं ते म्हणाले.

चंद्राच्या दक्षिण भागात यान उतरवणारा भारत पहिला देश आहे. तर चंद्रावर जाणारा भारत जगात चौथा देश आहे. २०१९ मध्ये भारताने चंद्रावर चांद्रयान-२ पाठवला होता. पण, मोहीम अयशस्वी ठरली होती. यावर बोलताना पवार म्हणाले की, यश-अपयश येत असतं, यश मिळाल्यावर आपले पाय जमिनीवर ठेवावे लागतात. आपल्या वैज्ञानिकांनी अपयश आल्यामुळे उमेद सोडली नाही.

भारतीय शास्त्रज्ञांनी दाखवून दिले की, भारत हा पुढे जाणारा देश आहे. नाउमेद होणारा देश नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले. विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा विकास होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. नेहरुंच्या प्रयत्नांचं आज चीज झालं. मी वैज्ञानिकांना शुभेच्छा आणि धन्यवाद देतो, असं पवार म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price List: एलपीजी सिलिंडरच्या नवीन दरसूची जाहीर; घरगुती ते व्यावसायिक सिलिंडरची किंमत जाणून घ्या

Maharashtra Education News: शिक्षण विभागाचा माेठा निर्णय! शिक्षकांसाठी वार्षिक ५० तास प्रशिक्षण सक्तीचे, गुणवत्तावाढीसाठी सरकारचे पाऊल..

Suvendu Adhikari assistant Killed : सुवेंदू अधिकारींचा पीए चंद्रनाथ रथ यांची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या, ममतांवर आरोप; असा आहे घटनाक्रम

Maratha Empire Map: आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला, भोसले घराण्याची उच्च न्यायालयात धाव, समितीवर मराठा इतिहासतज्ज्ञ नाही!

Mexican Style Street Corn Salad: सकाळच्या नाश्त्याला द्या झणझणीत पण हेल्दी ट्विस्ट! बनवा मेक्सिकन स्टाईल स्ट्रीट कॉर्न सॅलड

SCROLL FOR NEXT