Sambhaji Bhide  
महाराष्ट्र बातम्या

'मनु' अजोबा चंद्रावर तिरंगा फडकला, लइ वाईट...; राष्ट्रवादीच्या आमदाराची भिडेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्याने संपूर्ण भारतात आनंद साजरा करण्यात आला. अनेक नेत्यांनी चांद्रयान-3 लँडिंग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. अनेकांनी या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना दिलं. तर नेत्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली.

चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताचा तिरंगा झेडा आणि चांद्रयानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या तिरंगा झेंड्यांच्या फोटोवरून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला.

मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलं की, "मनु" आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला...लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान बी हाय म्हणत्यात... आता कसं.

काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. शिवाय तिरंगा झेंड्याबाबतही भिडेंनी आक्षेप नोंदवला होता. तोच धागा पकडून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Mumbai News: मेट्रोमुळे 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीचा महसूल बुडाला

SCROLL FOR NEXT