Changes in the rules for wedding ceremonies in the Maharashtra  
महाराष्ट्र बातम्या

राज्यात लग्न समारंभासाठी नियमात बदल; इतर कार्यक्रमांसाठी कसे आहेत निर्बंध?

सकाळवृत्तसेवा

पुणे :  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढ चिंताजनक वेगाने होत असल्याने कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादले असून आज (बुधवारी) रात्री आठ वाजल्यापासून ते एक मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदी असणार आहे. या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाहीत.
 

राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्य निर्बंधानुसार, राज्यात आता 50 ऐवजी 25 लोकांच्या उपस्थिती लग्न सोहळा पार पडेल. दरम्यान, नियामांचे उल्लंखन करण्याऱ्यांवर आणि कार्यलय चालकांवर कडक कारवाई केली जाईल असा आदेश देण्यात आला आहे. तसेच अंत्यविधीसाठी केवळ २० जणांचीच उपस्थिती असावी.  धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असून धार्मिक ठिकाणे, प्रार्थनास्थळे बंद राहणार आहेत 

 काय असतील निर्बंध

  • लग्नासाठी जास्तीत जास्त २५ जणांना उपस्थित राहता येईल.
  • लग्नकार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असावे, तसेच सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झालेली असावी. चाचणी केलेली नसल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि कार्यालय चालकाला दहा हजार रुपये दंड
  • अंत्यविधीसाठी केवळ २० जणांचीच उपस्थिती असावी.
  • केवळ जीवनावश्यक वस्तू व सेवांसाठी ईकॉमर्स सेवा सुरू राहतील.
  • पाच किंवा त्याहून अधिक कोरोना रुग्ण एकाच इमारतीत आढळल्यास ती इमारत मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येईल. या इमारतीत बाहेरच्यांना प्रवेश नसेल
  • बांधकाम मजूर राहत असलेल्या ठिकाणचीच बांधकामे सुरू ठेवता येतील.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पठारे विरुद्ध पठारे! मार खाणारा तो सचिन पठारे मी नाही...; पुण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' राड्याला अनोखे वळण

AUSW vs PAKW: ७९-७ वरून २२१ धावा! पाकिस्तानने लावलेली वाट, पण ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी-एलना किंग राहिल्या ताठ! वर्ल्ड रेकॉर्डही नावावर

Sridhar Vembu's Zoho success story : कुणाकडून रुपयाचीही मदत न घेता, फक्त मित्र अन् कुटुंबाच्या पाठबळावर उभारली तब्बल 100000 कोटींची कंपनी!

Pune News : विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार

Latest Marathi News Live Update : माणुसकीची भिंत २०२५ उपक्रमाची सुरुवात

SCROLL FOR NEXT