Maratha Reservation Manoj Jarange-Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणार जरांगे-पाटलांची ‘या’ दिवशी सभा! शांतता रॅलीपूर्वी सोलापूर शहरासह गावागावात बॅनर लागणार

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात सोलापुरातून होणार आहे. जुलैअखेरची कोणतीही तारीख निश्चित होऊ शकते, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात सोलापुरातून होणार आहे. जुलैअखेरची कोणतीही तारीख निश्चित होऊ शकते, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी प्रशालेत या रॅलीच्या नियोजनाची बैठक झाली. या बैठकीत रॅली व सभेबाबत नियोजन करण्यात आले. धाराशिव येथील यापूर्वीच्या बैठकीत बोलताना सोलापूरच्या रॅलीसाठी मनोज जरांगे यांनी प्राधान्य दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर मंच तयार करून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत ध्वनिक्षेपकाची व श्रोत्यांना बसण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. ही रॅली व सभा यापूर्वीच्या २०१६ च्या मोर्चापेक्षा मोठी करण्याचे नियोजन करण्यात येत आले आहे. बैठकीला श्रीरंग लाळे, राजन जाधव, माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे, प्रशांत पाटील, प्रा. गणेश देशमुख, डॉ. प्रमोद पाटील, बालाजी सिरसट, गोविंद पाटील, विश्वास डोंगरे आदी उपस्थित होते.

बैठकीतील ठराव...

दहा महिन्यांत चार वेळा उपोषण केल्याने मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली आहे. यामुळे यापुढे त्यांना उपोषण करू देऊ नये, असा प्रमुख ठराव या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. त्याबरोबरच या रॅलीबाबत प्रचार व प्रसार करण्यासाठी गावागावात व वॉर्डावार्डात सर्वांनी जावे. गावातील सर्व वाहने रॅलीसाठी सोलापूरला आणणे. प्रत्येक कुटुंबातील महिला- पुरुषांनी रॅलीसाठी यावे, असे ठराव घेण्यात आले.

ठळक बाबी...

  • रॅलीसाठी शहरात सर्वत्र व गावागावात बॅनर लागणार

  • इतर समाज बांधवांना विश्वासात घेण्याचा निर्णय

  • महिला व पुरुषांसाठी विशिष्ट ड्रेसकोड ठरणार

  • पिण्याच्या पाण्यासह अल्पोपहाराची सोय करणार

कोण काय म्हणाले...

  • माऊली पवार : मराठा समाजाच्या मतांची आता राजकीय पक्षांना भीती वाटू लागली आहे. ‘पाडा’ शब्दाची सर्व राजकीय पक्षामध्ये दहशत

  • प्रा. गणेश देशमुख : कोणत्याही क्षणी होऊ शकते तारीख जाहीर, २० तारखेचे उपोषण रद्द झाल्यास २१ लाच सोलापुरात रॅली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यात सापडल्या ६६ हजार कुणबी नोंदी.

  • निर्मला शेळवणे : वार्डावार्डात घराघरात जाऊन रॅलीचा प्रचार

  • उदय देशमुख : करमाळा तालुक्यात २१ हजार कुणबी दाखल्याचे वाटप

  • विजय राऊत : सध्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. कुणबी दाखल्याची जात पडताळणी होणे गरजेचे. ज्यांना दाखले मिळाले त्यांची जात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT