

virar Accident
ESakal
विरार : नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली असून यानिमित्त हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी विरारच्या जीवदानी मंदिरात जात आहेत. मोठ्या थाटामाटात, जल्लोषात नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. मात्र अशातच उत्सवाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. विरारच्या जीवदानी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबातील मायलेकीचा अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.