Rupali Chakankar
Rupali Chakankar 
महाराष्ट्र

Exam : नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र तपासले; प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नीट परीक्षेच्या वेळी परीक्षेपूर्वी कॉपी होऊन नये म्हणून होणाऱ्या तपासणीच्या वेळी विद्यार्थ्यांशी गैरवर्तणूक झाल्याचा आरोप पालकांनी केला होता. राज्यातही सांगलीमध्ये असा प्रकार झाल्याची तक्रार पालकांनी केली होती.

या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून याप्रकरणाची चौकशी करून पुढील २ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याच्या वैद्यकीय शिक्षक संचालकांना दिले आहेत. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात अनेक केंद्रांवर घेतली गेली. अनेक केंद्रांवर काय झाले आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या वेळी कॉपी होऊ नये म्हणून काळजी घेत असताना विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होईल अशी तपासणी अतिशय चुकीची आहे. (Breaking Marathi News)

कोणत्या अधिकाऱ्यांनी अशा तपासणी करण्याच्या सूचना दिल्या? अशी तपासणी करण्याच्या सूचना कागदोपत्री देण्यात आल्या होत्या का? असे अधिकार त्या अधिकाऱ्यांना आहेत का? आणि हि तपासणी संबंधित विभागाला मान्य आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राज्य महिला योगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरातील प्रकारांची चौकशी करणे गरजेचे आहे. सांगलीतील घटना समाजमाध्यमातून आमच्यापर्यंत आली. मात्र आणखी कुठे अशी घटना घडली असेल तर त्याची तातडीने चौकशी करावी. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी राज्य महिला आयोगाला सादर करावा असे निर्देश देण्यात आल्याचेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

LTTE Ban: राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली; मोदी सरकारचा निर्णय

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: मोदी-शहांना दिलासा, सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या द्वेषपूर्ण भाषणांविरोधी याचिक

SCROLL FOR NEXT